नवी दिल्ली प्रतिनिधी । भारतीय संघाचा ‘हिटमॅन’ म्हणून ओळख जाणारा रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवशी षटकारांच्या नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
रोहित शर्माने आता कसोटी, वन डे आणि टी-२० या तिन्ही फॉर्मेटमध्ये एका-एका सामन्यात सर्वात जास्त षटकार ठोकण्याचा विक्रम केला. रोहित शर्माने २०१३ मध्ये खेळल्या गेलेल्या एका वन डे सामन्यात १६ षटकार ठोकले होते. त्यानंतर त्याने २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना टी-२० सामन्यात एकूण १० षटकार ठोकले होते. तर रोहित शर्माने सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात आतापर्यंत १० षटकार ठोकले आहेत. याप्रकारे रोहित शर्माने भारताकडून खेळताना तिन्ही फॉर्मेटमध्ये एका-एका सामन्यात सर्वात जास्त षटकार ठोकणार तो एकमेव खेळाडू बनला आहे.