आजच्याच दिवशी रोहितने रचला इतिहास

rohit sharma

 

मुंबई प्रतिनिधी । भारतात प्रथमच डे-नाइट टेस्ट २२ नोव्हेंबरपासून कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये खेळली जाणार आहे. ५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (दि.१३ नोव्हेंबर) कोलकाताच्या मैदानावर वनडे क्रिकेटचा सर्वात जबरदस्त खेळ खेळण्यात आला होता. एक असा खेळ ज्यात ३३ फोर आणि ९ सिक्स मारण्यात आले होते. अशी तूफान खेळी क्रिकेटर रोहित शर्मा याने खेळत नवीन इतिहास रचला होता.

पाच वर्षांपूर्वी १३ नोव्हेंबर २०१४ मध्ये कोलकातामध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळण्यात आलेल्या वनडे मॅचमध्ये रोहित शर्माने २६४ धावा करत वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. आजपर्यंत रोहितचा हा रेकॉर्ड कोणत्याही क्रिकेटराला मोडता आलेला नाही. १३ नोव्हेंबर २०१४ मध्ये भारत आणि श्रीलंकामध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने पहिले बॅटिंग करत ४०४ धावांचा डोंगर उभा केला होता. त्यापैकी १७३ बॉलमध्ये रोहितने २६४ धावांची खेळी केली होती. यात ३३ फोर आणि ९ सिक्सचा समावेश होता. रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये २६४ धावा करून आणखी एक विक्रम केला, जो आजपर्यंत अतूट आहे. रोहित शर्मा वनडे क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा द्विशतक करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला.

Protected Content