मुक्ताईनगर, प्रतिनिधी । काल झालेला अवकाळी पाऊस आणि वादळामुळे मेंढोळदे, पूर्णाड उचंदा, शेमळदे येथील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली तसेच शेती पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. आज या परिसरला जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी भेट देऊन पाहणी केली.
आज जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी काल झालेला अवकाळी पाऊस आणि वादळामुळे मेंढोळदे, पूर्णाड उचंदा, शेमळदे येथे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. लगेचच त्यांनी जिल्हाधिकारी यांचेशी संपर्क साधून महसुल प्रशासनाने नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे अशी विनंती केली. याप्रसंगी त्यांच्या सोबत जि. प. माजी गटनेते विनोद तराळ,तालुका अध्यक्ष यु. डी. पाटील सर, जेष्ठ नेते सुधाकर पाटील,बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, संदिप देशमुख, माणिकराव पाटील, माफदा तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील,बाजार समिती संचालक कैलास पाटील, गुड्डू पाटील, साहेबराव पाटील, पुंडलिक कोळी, जावजी धनगर,भैय्या पाटील,सद्दाम शेख उपस्थित होते.