मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ मुक्ताईनगर तालुक्यातील नरवेल, भोकरी, बेलखेड, धामणदे येथे महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ यांच्या उपस्थितीत प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रचार रॅलीला मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी मतदारांना अनुक्रमांक तीन वरील ” तुतारी वाजवणारा माणुस” या चिन्हासमोरील बटण दाबून श्रीराम दादा पाटिल यांना आपला मतदानरुपी आशिर्वाद देण्याची विनंती केली. यावेळी मतदारांशी संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, केळीचे आगार म्हणुन आपला रावेर विभाग जगप्रसिद्ध आहे. निर्यातक्षम केळी उत्पादित करण्याची क्षमता असतानाही नैसर्गिक आपत्ती आणि अपुऱ्या सोयी सुविधांमुळे येथिल केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सत्ताधाऱ्यांकडून ठोस मदतीची अपेक्षा असताना सत्ताधारी नुसते आश्वासनांची खैरात वाटून केळी उत्पादकांची निराशा करत आहेत २०२१ मध्ये फलोत्पादन क्षेत्र विकास (हॉर्टिकल्चर क्लस्टर प्रोग्रॅम) सुरू करण्यात आला होता. जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम केळी असताना क्लस्टर मध्ये जळगाव जिल्ह्याला डावलण्यात आले परंतु पुढील टप्प्यात जळगाव जिल्ह्याचा समावेश करण्यात येईल असे केंद्रीय कृषिमंत्री यांनी आश्वासन देऊनही अद्यापही जळगाव जिल्ह्याचा क्लस्टर मध्ये समावेश झालेला नाही.
मुख्यमंत्री आणि फलोत्पादन मंत्री यांनी ५० कोटी आर्थिक तरतुदी सह केळी विकास महामंडळ स्थापनेची, केळीला फळपिकांचा दर्जा देण्याची सभागृहात घोषणा करून सुद्धा त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही नाही केळी विकास महामंडळ स्थापन झाले तर केळी उत्पादक क्षेत्राचा विकास होईल केळीवर संशोधन होऊन उच्च रोगप्रतिकारक क्षमता असलेले दर्जेदार टिश्यू कल्चर रोपांची निर्मिती करून शेतकऱ्यांना ते अनुदानावर कमी दरात उपलब्ध होतील. केळीचे मार्केटिंग होऊन केळीला जागतिक बाजारपेठ मिळण्यासाठी मदत होऊन केळी निर्यातीला चालना मिळेल गोडाऊन, शितकरण गृहांची निर्मिती होऊन ते अल्प दरात शेतकऱ्यांना उपलब्ध होतील केळी वर प्रक्रिया उद्योगांची उभारणी होईल उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळेल यासारख्या अनेक सुविधा केळी विकास महामंडळाच्या माध्यमातून प्रस्तावित असताना सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यां विषयी असलेल्या अनास्थेमुळे घोषणा करूनसुद्धा केळी विकास महामंडळाची स्थापना होत नाही. शरद पवार साहेब केंद्रिय कृषिमंत्री असताना त्यांनी त्यावेळी केळीवरील करपा रोग निर्मूलनासाठी पॅकेज दिले होते यातून करपा निर्मूलनासाठी आवश्यक असलेले किटकनाशक औषधे शेतकरी बांधवाना अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येत होती. त्यातुन करपा रोगावर बऱ्यापैकी आळा बसला होता याउलट जेव्हा केळीवर सि एम व्ही रोगाचा प्रादुर्भाव झाला त्यावेळी आताच्या सत्ताधाऱ्यांनी कोट्यवधी रुपये आर्थिक मदतीच्या घोषणांचा पाऊस पाडून प्रत्यक्षात मोजक्या शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत दिली.सत्ताधाऱ्यांनी केळी किसान रॅक वरील अनुदान बंद केले त्यामुळे इतर राज्यात केळी पाठवण्यासाठी शेतकरी बांधवाना अधिकचा आर्थिक भार सोसावा लागत आहे.
केळी पिक विम्याचे निकष बदलवल्यामुळे केळी पिक विम्याची भरपाई मिळवण्यासाठी शेतकरी बांधवाना संघर्ष करावा लागत आहे. बियाणे खते व शेतीविषयक साहित्याच्या दरात प्रचंड दरवाढ झालेली असताना सत्ताधाऱ्यांनी शेतमालाला दुप्पट हमीभाव देण्याचे आश्वासन देऊनही कोणत्याच शेतमालाला उत्पादन खर्चाची ताळमेळ बसू शकेल असा भाव नाही त्यामुळे शेतकऱ्यांची फरफट होत आहे तरुणांना रोजगार नाही महागाईने उच्चांक गाठल्याने सामान्य जनता रडकुंडीला आली आहे. हे चित्र बदलवण्यासाठी प्रगतीची विकासाची ललकारी निनादवण्यासाठी सर्वांनी शेतकरी कष्टकरी महिला तरुणांच्या विकासाचे व्यापक व्हिजन असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तुतारी हातात घ्या आणि येत्या १३ मे रोजी श्रीराम पाटील यांच्या नावासमोरील ‘तुतारी फुंकणारा माणूस’ या चिन्हाचं बटण दाबून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे रोहिणी खडसे यांनी मतदारांना आवाहन केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ यांनी आपले शेती, आरोग्य,दळणवळण सिंचनाचे मुलभूत प्रश्न संसदेत मांडण्यासाठी श्रीराम पाटिल यांना मतदान करून त्यांना खासदार म्हणुन दिल्लीला पाठवण्याचे उपस्थितांना आवाहन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ईश्वर भाऊ रहाणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष यु. डी. पाटील सर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दिनेश पाटिल, बोदवड बाजार समितीचे सभापती सुधिर भाऊ तराळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पवन राजे पाटिल, रामभाऊ पाटिल, लता ताई सावकारे, निवृत्ती महाजन, बबलू कापसे, निळकंठ महाजन, सुनिल पाटिल, पद्माकर कापसे आणि महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते