वरखेड खु येथील पारावर गावातील तरूणांशी रोहिणी खडसेंनी साधला संवाद

मुक्ताईनगर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे या बोदवड तालुका दौऱ्यावर असताना त्यांनी वरखेड खु येथे पारावर गावातील तरुणांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वरखेड येथिल गणेश अनिल पाटिल या तरुणाने पद्मश्री व्हि. बि. कोलते तंत्रनिकेतन मलकापूर येथे प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल गणेश आणि त्याच्या वडिलांचा सत्कार केला.

यावेळी गावातील तरुण उपस्थित होते तरुणांशी संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, ‘गावखेड्यातील तरुण प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण व इतर क्षेत्रात भरारी घेत आहेत हि सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे सर्वांनी अशा तरुणांचा आदर्श घेणे आवश्यक असुन आपण ज्या क्षेत्रात शिक्षण घेत आहोत कार्य करत आहोत, त्या क्षेत्रात मेहनत घ्या. चिकाटीने अभ्यास करा आणि आईवडील व परिसराचे नाव उज्वल करा तसेच नियमित व्यायाम करा शारीरिक स्वास्थाकडे लक्ष द्या काही ताणतणाव, अडचण असेल तर कुटुंबातील व्यक्ती मित्र परिवाराशी नेहमी संवाद साधा. आम्ही सर्व पदाधिकारी सदैव तुमच्या सोबत आहोत. काही अडचणी असल्यास संपर्क साधा आम्ही सर्व पदाधिकारी त्या सोडविण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

रोहिणी खडसे पुढे म्हणाल्या की, ‘भविष्यात प्रत्येक गावात व्यायामशाळा आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांसाठी अभ्यासिका स्थापन करण्याचा आपला मानस असल्याचे तसेच तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी युवकांनी व शालेय विद्यार्थ्यांनी रोहिणी खडसे यांच्याकडे विविध समस्या मांडल्या त्या सोडविण्याचा आपण प्रयत्न करू असे रोहिणी खडसे यांनी युवकांना आश्ववस्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष आबा पाटिल, रामदास पाटिल, अनिल पाटिल, गणेश पाटिल, शाम सोनवणे, आनंदा पाटिल आणि ग्रामस्थ उपस्थित होते

Protected Content