जळगाव प्रतिनिधी | सिंधी कॉलनीत संत हरदासराम बाबा यांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकेची पर्समधून पैसे चोरणाऱ्या चोरट्यास एमआयडीस पोलीसांनी अटक केली होती. आज गुरूवार रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
भारत अनिल कुकरेजा (रा.बाबानगर, सिंधी कॉलनी) असे संशयित चोरट्याचे नाव आहे. छत्तीसगड येथून आलेले भाविक राजकुमार नंदलाल लालचंदाणी हे २४ मार्च रोजी कुटूंबीयांसह शहरातील सिंधी कॉलनी येथे संत हरदासराम बाबा यांच्या दर्शनासाठी आले होते.त्यामुळे ते संत हरदासराम साहेब मंदिराच्या मागील धर्मशाळेतील खोली क्रमांक ७ मध्ये थांबलेले होते. त्यावेळी दरवाजा घडला असल्याचा फायदा घेत चोरटा भारत कुकरेजा यांने पर्स मधील दोन हजार रूपयांची रोकड चोरून नेली होती. सीसीटीव्हीमध्ये चोरटा कैद झाला होता. याप्रकरणात बुधवारी गुन्हा दाखल होताच एमआयडीसी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे संशयित चोरटा भारत अनिल कुकरेजा (रा.बाबानगर, सिंधी कॉलनी) याला अटक केली आहे. आज गुरूवारी चोरट्यास न्यायालयात हजर केले आसता न्या.ए.एस. शेख यांनी 18 मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. याबाबत ॲड. निखील कुलकर्णी काम पाहत आहे.