जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सिल्व्हर पॅलेसच्या समोर एका तरूणाला मध्यरात्री रिक्षाचालकासह एकाने धारदार वस्तूचा धाक दाखवत एटीएम कार्डसह २० हजार २५० रूपयांची रोकड जबरी हिसकावून घेतल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे अडीच वाजता घडली आहे. या गुन्ह्यातील दोन जणांना अटक करण्यात आली असून सायंकाळी ६ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जगदीश लक्ष्मण बडगुजर वय २६ रा. पिंप्राळा जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ३१ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास जगदीश हा घरी जाण्यासाठी रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्ही ५६५८) मध्ये बसला होता. त्यावेळी रिक्षा चालक गोलू निकम वय २२ रा. रामनगर, जळगाव आणि प्रविण महाजन रा.जळगाव या दोघांनी धारदार वस्तूचा धाक दाखवत जगदीश जवळून एटीएम कार्ड आणि २० हजार २५० रूपयांची रोकड जबरी हिसकावून घेतली. हा प्रकार घडल्यानंतर जगदीश बडगुजर याने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी गोलू निकम वय २२ रा. रामनगर, जळगाव आणि प्रविण महाजन रा.जळगाव या दोघांविरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी दोघांना अटक केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र शिखरे हे करीत आहे.