साहित्यिक डॉ. नारखेडे यांच्या नातूचा साध्या पद्धतीने विवाह

जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत मोठ्या प्रमाणात गर्दी करू नयेत असं निर्देश देण्यात आले आहे. यानुसार साहित्यिक डॉ. अरविंद नारखेडे यांच्या नातूचा विवाह साध्या पद्धतीने घरातच संपन्न झालं.

लॉकडाऊन असल्याने सोशल डिस्टन्सचे नियम पाळून साहित्यिक डॉ. अरविंद नारखेडे यांचे नातू आणि सुनिल नारखेडे यांचे चि.युगंधर (एम.टेक ) यांचा शुभविवाह श्रीमती सुरेखा हेमंत अत्तरदे यांची जेष्ठ कन्या चि.सौ.कां. गायत्री ( एम.एस. सी. ) हिच्यासोबत देवेंद्रनगर येथील राहत्या घरातच संपन्न झाला. इच्छा असूनही जिव्हाळ्याच्या मित्रांना निमंत्रित करु शकलो नाही याची खंत नारखंडे परिवाराने व्यक्त केली. या शुभमंगलप्रसंगी फक्त सात ते आठ व्यक्ती उपस्थित होते.

Protected Content