भुसावळातील इंदीरा नगरात रस्त्यांच्या कामाला सुरूवात

भुसावळ प्रतिनिधी ।  शहरातील प्रभाग क्र. २१ मधील नगरपालिका नगरसेवक रमेश नागराणी व नगरसेविका पुष्पाताई बत्रा यांच्या प्रयत्नातून व नगरपालिकेतर्फे इंदिरा नगर, डॉ. खानापूरकर यांचे रुग्णालय ते अभियान भवन पर्यंतच्या रस्त्यांचे भूमीपूजन जेष्ठ नागरिक मालती महाजन यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

दरम्यान, यावेळी आमदार संजय सावकारे व नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदिप चिद्रवार यांच्या उपस्थित भूमिपूजन पार पाडले. तसेच याप्रसंगी परिसरातील नागरिकांच्या वतीने आमदार संजय सावकारे यांचा सत्कार सुनील सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. सदर कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक युवराज लोणारी, नगरसेवक राजेंद्र नाटकर,माजी नगरसेवक निक्की बत्रा, अजय नागराणी, नगरसेवक राजेंद्र आवटे, सतीश सपकाळे, गिरीश महाजन, डॉ. मंगेश खानापूरकर, डॉ. अर्चना खानापूरकर, भाजयुमो शहराध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, मंगेश पाटील, चेतन बोरोले, धर्मराज देवकर, अरुण धांडे, अतुल गुरव, ज्ञानेश्वर भंगाळे, भारत बागुल, नितीन देशमुख, नंदु पाटील, बापू बर्हाटे, रितेश आंबोडकर, विलास सुरवाडे, मनोज सरोदे, देशमुख काका इतर महिला व नागरिक उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी यावेळेस समाजसेवक अजय नागराणी व निक्की बत्रा यांचा सुद्धा सत्कार केला. सदर कार्यक्रम प्रसंगी सूत्रसंचालन धर्मराज देवकर यांनी केले व आभार प्रदर्शन मंगेश पाटील यांनी केले रस्त्याचे काम होत असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

 

 

Protected Content