दहिगाव येथे गुढी पाडव्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील दहिगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने नववर्षाच्या स्वागतार्थ ९ एप्रिल रोजी आज सकाळी पथसंचालन करण्यात आले पदसंचलनाची सुरुवात आदर्श विद्यालयातून करण्यात आली. तेथून संपूर्ण गावातून हे पतसंचलन काढण्यात आले. त्यानंतर पथसंचलनाचे समारोप सार्वजनिक विठ्ठल रुक्माई मंदिरासमोर करण्यात आले.

सुरुवातीस डॉ. केशव हेगडेवार व अन्य राष्ट्रीय पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सर्व जाती जमातींना घेऊन जाणारा राष्ट्रीय स्वयं संघ आहे. देशभक्तीसाठी व देशभक्त निर्माण करण्यासाठी १८ कुठे जाती धर्मांना एकत्र घेऊन चालणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रशांत देवरे यांनी केले तर प्रगतशील शेतकरी भगवान महारु पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. डॉ.केशव बळीराम हेगडेवार हे असे एक देशभक्त होते की, त्यांनी समाजसेवेसाठी सर्व जातींना सोबत घेऊन समाजसेवा व देशभक्त घडवायचे कार्य केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातूनच जागतिक योग दिवस आपण आज साजरा करीत आहोत असेही यावेळी देवरे यांनी म्हटले.

यावेळी यावलचे डॉ.कुंदन फेगडे, डॉ.विजय संघवी, चंद्रशेखर पाटील, मिथुन वाघोडे, रोशन सोनवणे, मंदार बयाने, सचिन चौधरी, हितेश बोडे, दिनकर भावसार, जितेंद्र पाटील, हर्षल मोरे, हर्षल महाजन, नितेश मोरे, शुभम धनगर, संजय चोपडे, सुपडू पाटील, हेमंत वारके, यश पाटील, समाधान वराडे, रमेश पाटील ,जगदीश सपकाळे, दिनेश शिरसागर, देविदास पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुरेश पाटील, महेंद्र सोनार, सुपडू पाटील, कैलास पाटील, मयूर पाटील, पी डी चौधरी आदी उपस्थित होते.

 

Protected Content