जळगाव प्रतिनिधी । प्रिंपाळा रेल्वे गेट समोरील रस्त्यावर गटाराचे सांडपाणी नेहमी रोडवर वाहत असते त्यामुळे वाहन धारकांना गाडी चालवतांना जीव मुठीत धरून चालावे लागते .
पिंप्राळा रोड दत्त कॉलनी ( शाहू नगर ) परिसर म्हणून हा भाग ओळखला जातो या भागात गटारींमध्ये कचरा साचून त्या तुंबल्या आहेत . या तुंबलेल्या गटारींमधून वाहणारे पाणी रस्त्यावर येत असल्याने रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे . शेकडो लोक या रस्त्याने दरारोक ये जा करतात . तरीही ही समस्या महापालिकेच्या अजून लक्षात कशी येत नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे
दिवसेंदिवस या रस्त्यावरून वर्दळ वाढत असताना महापालिकेचे सफाई कर्मचारी असे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याने रोष वाढतो आहे . वाहनधारकांना उखडलेला रस्ता आणि रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यातून वाट काढावी लागते सर्व प्रकारची वाहने या रस्त्यावरून धावत असतात . प्रत्येक वाहनधारक खड्डे आणि तुंबलेलं पाणी चुकवन्याच्या विचारात वाहन चालवत असतो त्यामुळे या जवळपास १ किओल्मीतर अंतराच्या रस्त्यावर विनाकारण वेळ वाया जातो