अमळनेर (प्रतिनिधी) बहुतांश आजार हे पाण्यापासूनच होत असल्याने ग्रामिण भागात अनेकदा साथीचे आजार पसरत असतात. यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी अमळनेर मतदार संघात गाव तेथे शुद्ध व थंड पाण्याचे आरओ प्लांट ही संकल्पना आ. शिरीष चौधरींनी मांडली असून ग्रामपंचायत अथवा ग्रामस्थांना कोणताही भुर्दंड न देता आमदार निधीतून हे प्लान्ट बसविले जात आहेत.एकूण सहा गावात प्लांट बसविण्याचे काम पूर्णत्वास आले असून आ. चौधरींच्या हस्ते त्यांचे लोकार्पण करण्यात आले.
मतदार संघातील रत्नापिंप्री,शेळावे बुद्रुक,सडावन, कलाली, बहादरपूर, कुऱ्हे आदी सहा गावांमध्ये आरओ प्लांटचे मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात आले. या प्लान्टमुळे ग्रामस्थांना अतिशय कमी दरात शुद्ध व थंड पाणी मिळणार असून ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर ही सोय झाल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. यावेळी आमदार चौधरी यांनी आपल्या मनोगतात विकासाचा आढावा मांडून दमदार विकासासाठी तुम्ही देखील दमदार साथ द्या, असे भावनिक आवाहन केले. तसेच अनेक आजारांचे मूळ हे पाणी असल्याने ग्रामिण जनतेचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी गाव तेथे आर ओ प्लांट ही संकल्पना राबवित आहे. येत्या काही दिवसात प्रत्येक गावात हे प्लांट लागलेले दिसतील असा, आशावाद आमदार श्री.चौधरी यांनी व्यक्त केला.
20 गावांना आर ओ प्लांट मंजूर
आमदार निधीमधून ( 90 लाख रुपये निधी अंतर्गत ) अजून 20 गावांना आरओ वॉटर फिल्टर प्लांट मंजूर झालेले आहेत. त्यात मतदार संघातील अमळगाव, पातोंडा, कलाली,आर्डी-अनोरे, सडावन, टाकरखेडा, कुऱ्हे चांदणी, मांडळ, निंब, कळमसरे, जुनोने, नगाव बु, पिपळें चिमनपुरी, दहिवद, सारबेटे,महाळपुर, शेळावे,रत्नापिंप्री, बहादरपूर, वसंतनगर आदी ठिकाणी हे प्लांट बसविले जात आहेत. लवकरच काम पूर्णत्वास आल्यानंतर याचे लोकार्पण केले जाईल. तसेच पुढील टप्प्यात निधी मंजुरी नंतर इतर गावांना हे आरओ प्लांट बसविले जातील, अशी माहिती आमदार शिरीष चौधरी यांनी दिली.
आ. चौधरींच्या माध्यमातून वरील सहाही गावाना इतर उल्लेखनीय विकासकामे झाल्याने आमदारांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी पालिकेचे गटनेते प्रवीण पाठक, नगरसेवक नरेंद्र चौधरी, बाळासाहेब सदांनशीव, पंकज चौधरी, आबु महाजन, सुनील भामरे, मा सरपंच राजेंद्र पाटील, रत्नापिंप्री सरपंच प्रमिला भिल, शेळावे बुद्रुक सरपंच किरण पाटील, सरपंच कलाली शशिकांत पाटील, माजी सरपंच दीपक पाटील, गुलाब महाजन,तंटामुक्त अध्यक्ष दगडू पाटील, माजी प.स उपसभापती दीपक पाटील,उपसरपंच सुरेश पाटील, शशिकांत कोळी, सुरेश पाटील, रत्नाबाई पाटील, छोटूलाल पाटील,राजेंद्र पाटील, विजय पाटील, संजय पाटील, रवींद्र पाटील, किरण वराडे, युवराज पाटील, गुलाब महाजन, दीपक पाटील,बाळा पाटील, मधुकर पाटील,सतीश पाटील, धनराज पाटील, रवींद्र काटे, अशोक पाटील, राजीवकुमार पाटील, विलास पाटील,गोविंदा पाटील, सुनील चौधरी, किशोर पाटील, बबन पाटील, मच्छिंद्र पाटील, गजानन पाटील, गुलाब पाटील, मंगल पाटील, चुनीलाल पाटील, आबा कोळी राहुल कोळी,राहुल पाटील, भुषण पाटील तसेच रत्नापिंप्री,शेळावे बुद्रुक,सडावन, कलाली, येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.