पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लम्पी स्कीन आजाराची गंभीर दखल घेत ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी १ कोटी रूपयांचा निधी शासनस्तरावर उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहे. लम्पी आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी पहूर येथे लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यासोबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मंगळवारी १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता तातडीची बैठक घेवून लम्पी आजाराबाबत लसीकरणाचे आवाहन केले आहे.
जामनेर तालुक्यातील पहूर येथे मंगळवारी १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गृप ग्रामपंचायत सहभागृहात लोकप्रतिनिधी व पशुसंवर्धन मालक यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. याबैठकीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पशुसंवर्धनावर आलेल्या लम्पी आजाराने ग्रस्त असलेल्या पशुसंवर्धन मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होऊन सर्व पशुसंवर्धन मालकांनी लसीकरण ताबडतोब करून घ्यावे, व ग्रामपंचायत मदत करावी असे आवाहन केले.
त्यानंतर पहूर कसबे येथील समाधान कचरे यांच्या बैलाला लम्पी आजाराने बांधीत झालेल्या बैलाची अभिजीत राऊत यांनी पाहणी केली. तसेच येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन वैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड यांच्याशी येथील परिस्थिती सविस्तर माहिती घेतली. लवकरात लवकर अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.
याप्रसंगी सरपंच लोकनियुक्त नीता पाटील, सरपंच शंकर जाधव, अरविंद देशमुख, माजी जि.प. सदस्य राजधर पांढरे, गणेश पांढरे, उपसरपंच श्याम सावळे, उपसरपंच राजू जाधव, माजी उपसरपंच रवींद्र मोरे, मुख्याध्यापक आर. बी. पाटील, चेतन रोकडे, बंडू पाटील, भाजपा शहराध्यक्ष संदीप बेढे, भारत पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी राठोड तलाठी, जैन माजी सरपंच लक्ष्मण गोरे, पंचायत समिती सदस्य योगेश भडांगे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.