नंदुरबार प्रतिनिधी । येथे प्रार्थनास्थळातील वादातून एकाच धर्माच्या दोन गटांमध्ये जोरदार धुमश्चक्री घडली असून या प्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, मोहम्मद आबिद शेख जैनोदिन वय- ३६ रा. चिराग गल्ली, नंदुरबार याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नमाजाकरीता चिराग अली मशिद समोर दिनांक आठ मे २०१९ रोजी रात्री जमावाने गर्दी केली होती. त्यावेळी आवाहन केले की गर्दी करू नका, फक्त ५ लोकांना परवानगी आहे. नमाज पठण करण्यापासून जमावाला रोखले या रागातून मग ते अंगावर धावून आले. तसेच मोठा जमाव जमवून हातात लोखंडी रॉड लाकडी दांडे हॉकी स्टिकने फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ व दमदाटी करून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून जखमी केले. यात शेख आबिद शेख जैनोदिन, शेख आसिफ शेख जैनोदिन रा. चिराग गल्ली नंदुरबार हे दोन्ही जखमी झाले असून जिल्हा रुग्णालयात औषधोपचार घेत आहेत.
या फिर्यादीवरून फरीद शेख गुलाम रसुल, फिरोज शेख गुलाम रसुल, रशिद शेख गुलाम रसुल, आरिफ शेख गुलाम रसुल, रहिस शेख गुलाम रसुल, अनिस शेख गुलाम ससुल, इम्रान शेख गुलम रसुल, निहाल शेख मेहमुद मिस्तरी, मेहमुद गुलाम हुसेन, फहिम अब्दुल गुलाम रसुल, कादिर शेख, शाहिद शेख सलीम, सलीम शेख, सर्व रा. चिराग गल्ली नंदुरबार या १२ जणांसह जमा विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. या सर्व जणांना अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक पी. पी. सोनवणे अधिक तपास करीत आहेत.
तर दुसर्या बाजूने फरीद शेख गुलाम रसुल वय ४५ रा. चिराग गल्ली ता. जि. नंदुरबार याने फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, नमाज पठणावरून तसेच चिराग अली मशिदीच्या मालकीच्या घराच्या भाडयावरून वाद झाला. तेव्हा जमाव चालून आला. फिर्यादी व त्याचा पुतण्या शाहिद यास जिवे ठार मारण्याचे उद्देशाने शाहिद याचे डोक्यावर लोखंडी पाईपने वार करून दुखापती केले तसेच फिर्यादीचा मोठा भाऊ सलीम यास देखील मारहाण केली व फिर्यादीचे घरात घसून घर सामानाचे व घराजवळ दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या वाहनाचे काचा फोडून नुकसान केले. यात जखमी झाल्याने सलीम शेख गुलाम रसूल, साहिद शेख सलीम शेख, फरिद शेख गुलाम रसुल सर्व रा. चिराग गल्ली नंदुरबार यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार चालू आहेत. या फिर्यादीवरून सैयद सेहबाज सैयद मोतेबर अली, सैयद मोतेबर अली, शेख अबिद शेख जैनोदीन, शेख आकिब शेख जनौदीन, शेख आरिफ शेख जैनोदिन, अनिस ईस्माईल चिराग अली मेमन, शेख आतीफ जनौदिन, शेख आसिफ जैनोदिन, जाविद खान इमानखान सर्व रा.चिराग गल्ली नंदुरबार या ९ जणांसह जमावाविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.