जळगाव प्रतिनिधी । शहरात मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्यामुळे काही काळ धावपळ उडाली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवाजीनगर परिसरातील अज्जू या युवकाचे उस्मानिया पार्कमधील तरूणाशी भांडण झाले. यात जखमी झालेल्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर परिसरात आलेल्या एका तरूणाला कोणतेही कारण नसतांना समोरच्या गटाने मारहाण केली. यामुळे परिसरात धावपळ उडाली. यानंतर पुष्पलता बेंडाळे चौक आणि नेरी नाका स्मशानभूमिसमोर हे दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकले. यात काही तरूण जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून शेवटचे वृत्त हाती आले तोवर गुन्हा नोंदणीचे काम सुरू होते. दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.