जळगाव प्रतिनिधी । माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्या पाठपुराव्याने शहरातील रिक्षांना मीटर लागणार असून याची सक्त अंमलबजावणी करण्यात यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी अनेक महत्वाच्या मुद्यांवरून न्यायालय आणि माहितीचा अधिकार यांच्या माध्यमातून लढा दिला आहे. याचाच पुढील टप्पा शहरातील रिक्षा वाहतुकीच्या संदर्भात त्यांनी गाठला आहे. त्यांच्याच पाठ पुराव्याने आता जळगाव शहरातील रिक्षांना मीटर लागणार आहे. शहरातील अनेक रिक्षाचालक हे अव्वाच्या-सव्वा आकारणी करत असल्याचे आरोप कधीपासूनच करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमिवर, गुप्ता यांनी पाठपुरावा केल्यामुळे आता शहरातील रिक्षांची भाडे आकारणी ही मीटरनुसार होणार आहे. याबाबत गुप्ता यांनी हॉटेल मोराक्कोमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. या नियमाची सक्तीने अंमलबजावणी होण्याची अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली.
पहा : दीपककुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती.