कुलभूषण जाधव यांना अपील करण्याचा अधिकार

इस्लामाबाद | पाकिस्तानच्या कारागृहात असणारे कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी संसदेच्या संयुक्त बैठकीदरम्यान आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानुसार  अपील करण्याचा अधिकार देणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे.

 

५१ वर्षीय निवृत्त भारतीय नौदल अधिकारी, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने एप्रिल २०१७ मध्ये हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. जाधव यांना कॉन्सुलर ऍक्सेस नाकारल्याबद्दल आणि फाशीच्या शिक्षेच्या विरोधात, भारताने पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती.

 

दोन्ही बाजू ऐकल्यानंतर, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जुलै २०१९ मध्ये एक निर्णय जारी केला, ज्यामध्ये पाकिस्तानला जाधव यांना भारताचा कॉन्सुलर ऍक्सेस देण्यास सांगितले आणि त्यांच्या शिक्षेचा पुनर्विचार करावा हे देखील सुनिश्चित केले. इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती अतहर मिनाल्लाह, न्यायमूर्ती आमेर फारूक आणि न्यायमूर्ती मियांगुल हसन औरंगजेब यांचा समावेश असलेल्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने जाधव यांच्यासाठी वकील नेमण्याबाबत कायदा मंत्रालयाच्या खटल्याची सुनावणी केली. यानंतर त्यांना आता संसदेने अपील करण्याची परवानगी दिली आहे.

Protected Content