Home Cities जळगाव वीर सावरकर पुण्यतिथीनिमित्त रिक्षा युनियनकडून माल्यार्पण 

वीर सावरकर पुण्यतिथीनिमित्त रिक्षा युनियनकडून माल्यार्पण 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज शहरातील स्वतंत्र चौक येथे त्यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. सर्व सावरकर प्रेमींनी एकत्र येत राष्ट्रभक्तीची भावना जागृत ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी त्यांच्या कार्याची उजळणी करत प्रेरणादायी विचार मांडण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना आदरांजली वाहिली. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान, सामाजिक सुधारणा, साहित्यिक कार्य आणि राष्ट्रप्रेम या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला. त्यांच्या क्रांतिकारी विचारांची आजच्या पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी वीर सावरकर रिक्षा युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ सपकाळे यांनी सावरकरांच्या अविस्मरणीय कार्याचा आढावा घेतला. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे धाडस, अंदमानातील काळ्या पाण्याची शिक्षा भोगतानाही न खचणारी जिद्द आणि हिंदुत्वाचा विचार यांचा उल्लेख करत त्यांनी उपस्थितांना प्रेरित केले. “सावरकरांचे विचार आणि त्यांचे राष्ट्रनिष्ठ कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमास रिक्षा युनियनचे पदाधिकारी, सदस्य रिक्षाचालक-मालक तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देविदास भडंकर, कैलास विसपुते, दशरथ सोनवणे, आबा पाटील, प्रकाश दाभाडे, मुजेश सोनवणे, प्रकाश साळुंखे, राज गुप्ता, संतोष पवार, दिलीप सोनवणे, बापू माळी, भोला साळुंखे, विनोद पाटील, प्रकाश वाघ, दिनकर वाघ, बाळू पाटील, किशोर पाटील, रमेश निकम, योगेश धनगर, काशिनाथ महाजन, विजू सोनवणे, एकनाथ बारी, अमोल सपकाळे, वाल्मिक सपकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.


Protected Content

Play sound