पारोळा – येथील रिक्षा चालक आनंदा तुकाराम महाजन यांनी कोरोना प्रतिबंधक दृष्टीकोनातून आपल्या रिक्षा वर प्लास्टीक पाईपात पाणी व पुढे तोटी बसविली आणि सनिटायझरची देखील व्यवस्था केली आहे. या अनोख्या उपक्रमाबद्दल येथील सदानंद धडू भावसार यांनी आनंदा महाजन यांना आपल्या निवासस्थानी बोलावून त्यांचा सत्कार केला.
ग्राहकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून त्यांनी स्वत:च शक्कल लढवली. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल येथील गुण ग्राहक व्यक्तिमत्व राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांनी आनंदा महाजन यांना आपल्या निवासस्थानी बोलावून शाल, श्रीफळ, पुष्पहार, अभिनंदन पत्र व पाचशे रुपये रोख बक्षीस पाकीटात देऊन भावपूर्ण सत्कार केला.
आनंदा महाजन रिक्षात स्वच्छता तर ठेवतातच त्याचबरोबर सजावटही करतात.शाळकरी विद्यार्थ्यांच्या दप्तरासाठी शहरात फक्त त्यांच्याच रिक्षाला ट्राली आहे.
या सर्व बाबींमुळे एक उपक्रमशील ‘ महाजन भाऊ रिक्षावाले म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. याचा भावसार सरांना विशेष आनंद व अभिमान वाटल्याने ‘कोरोना योद्धा ‘ प्रमाणेच त्यांचे कार्य असल्याचे सरांनी सांगितले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भावसार सर व आनंदा महाजन यांचं अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.