यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आदीवासी सेवा मंडळ ( आसेम ) या संस्थेच्या वतीने यावल येथे आदर्श शिक्षक पुरस्कार आणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित मोठया उत्साहाच्या वातावरणात पार पडला.
यावल येथे आयोजित या सत्कार सोहळयाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावल पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके तर प्रमुख पाहुणे म्हणुन यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी जहॉंगीर तडवी, जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रफीक तडवी, जात पडताळणी विभागाचे रशीद तुडवी,धुळे येथील जिल्हा कृषी अधिकारी कुरबान तडवी , नाशिक येथील पुरवठा अधिकारी रमजान तडवी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांचा गौरव करून प्रोत्साहन देत असतांना शिक्षकांचा आदर, मानसन्मान करणे तितकेच महत्त्वाचे होते. म्हणुन आद्य क्रांतिकारक धरतीआबा तंट्या मामा भिल आदर्श शिक्षक पुरस्काराची सुरुवात करून बहुसंख्य आदिवासी विद्यार्थी असलेल्या शाळांवरील शिक्षकांना पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहित करण्याचा कार्यक्रम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. नेहमी प्रमाणे समाज विकासासाठी अनेक उपक्रमां प्रमाणे या महत्त्वाच्या विषयाला ही सुरूवात केली आहे. यात मोठे बदल आसेमं परिवाराच्या वतीने रविवारी दिनांक २४ सप्टेंबर रोजी यावल पंचायत समितीच्या जुन्या सभागृहात आयोजित सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमास परिसरातील पालक,शिक्षक,विद्यार्थी व समाज बांधव उपस्थित होते.
या सत्कार सोहळ्यात आद्य क्रांतीकारक धरती आबा तंटया मामा भिल आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी राजु ईब्राहीम तडवी ( मुवताईनगर ) चंद्रशेखर नवनाथ पाटील ( न्हावी ता यावल ) , एम. एच. तडवी ( डोंगर कठोरा ता यावल ), सौ पुनम केतन महाजन ( फैजपुर ता यावल ),राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सौ कल्पना देविदास माळी ( भुसावळ ), दिनेश अशोक पाडवी ( चिंचोल ता मुक्ताईनगर ) , सलीम नथ्थु तडवी , ( सौखेडा ता यावल )विश्वास झेलसिंग पावरा ( अम्मलवाडी ता चोपडा ), शरीफ मासुम तडवी (वरगव्हाण ता चोपडा ),जावेद याकुबखा तडवी ( भिंगारा जि बुलढाणा ) या गुरूजनांचा स्मृतीचिन्ह आणी सन्मानपत्र देवुन सत्कार सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सलीम तडवी ( सर ) यांनी केले तर उपस्थितांचे आभार ईरफान तडवी ( मुक्ताईनगर ) यांनी मानले . कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी संस्था अध्यक्ष राजु तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सन्मानिय पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.