रावेर पंचायत समितीत सीईओंनी घेतली आढावा बैठक

रावेर प्रतिनिधी । अनेक महत्वाच्या विषयांना बगल देऊन मुख्य कार्यकारी मुख्यधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी रावेर पंचायत समितीत आढावा बैठक घेतली.

 दरम्यान, महीना भरात सिईओ दूसऱ्यांदा रावेरात आले होते. रावेर तालुक्याचे अनेक महत्वाचे प्रश्नामुळे पंचायत समिती जिल्हा भर गाजत असतांना आज मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी रावेर पंचायत समितीला भेट दिली निमित्त होते. आढावा बैठकीचे  सर्वत्र एकच चर्चा होती. डॉ. आशिया रावेर पंचायत समितीच्या चर्चेत असलेले प्रश्नानावर काही तरी निर्णय घेतील. परंतु या सर्व दलितवस्तीचे कामे, ग्राम सेवकांचे बोगस अपंग प्रमाणपत्रे, इतर महत्वाच्या प्रश्नाना बगल देऊन आढावा बैठक घेऊन निघुन गेले. यावेळी महिला व बाल विकास विभागाच्या आढावा आरोग्य विभाग, शिक्षण विभाग बांधकाम विभाग ग्राम पंचायत विभाग ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जलसंधारण विभाग आदी विभागाच्या आधिका-यांनी डॉ. आशिया समोर आपल्या कामाचा आढावा दिला.

यांची होती उपस्थिती

दरम्यान रावेर पंचायत समितीच्या आढावा बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील पंचायत समिती सभापती कविता कोळी जिल्हा परिषद सदस्य कैलास सरोद पंचायत समिती सदस्य दिपक पाटील जितु पाटील जुम्मा तडवी गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल आदी उपस्थित होते.

 

 

Protected Content