जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पळासखेडा शिवारातून वाळूची वाहतूक करणारे डंपर पोलीसांनी रंगेहात पकडले. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर तालुक्यातील पळासखेडा शिवारातून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती महूसल विभागाला मिळाली. त्यानुसार पोलीसांनी १० जुलै रोजी सकाळी ११ वाजता कारवाई करत वाळूने भरलेले डंपर पकडले. वाळू वाहतूकीबाबत परवाना विचारला असता चालक राजू गोसावी याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर तलाठी मोहन प्रकाश महाजन यांनी वाळूने भरलेला डंपर पोलीस ठाण्यात जमा केला. याप्रकरणी तलाठी मोहन महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक राजू गोसावी आणि एक अनोळखी अशा दोन जणांविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अतुल पवार करीत आहे.