भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ महसूल उपविभागातील भुसावळ तहसिल कार्यालयास जिल्हाधिकारी यांच्याकडून सन २०२३-२४ या आर्थिक वर्षांकरिता महसूल वसूलचे १२.३५ कोटी रूपयांचे उदिृष्ट देण्यात आलेले होते. उपविभागाचे प्रांत अधिकारी जितेद्र पाटील तसेच तालुक्याचे तहसिलदार निता लबडे यांचे अचूक नियोजनामुळे यंदाही सलग तिसऱ्या वर्षी भूसावळ तालुक्याने ३१ मार्च पूर्वीच ११० टक्के वसूल करून जिल्हयात तालुक्याचे मान मिळविलेला आहे. यापूर्वीही सन २०२१-२०२२, २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात अनुक्रमे १०५.०० टक्के व १७३.०० टक्के विक्रमी वसुली केलेली असून यंदाही तालुक्याने मुदतीच्या आत वसूली पूर्ण करून हॅट्रीक साधली आहे.
महसूल वसूलीमध्ये विविध पथके नेमून अवैध गौण खनिज कारवाई करून, वाहन जप्ती लिलाव तसेच दंडात्मक वसूली तसेच तालूक्यातील स्टोन क्रशन धारक यांचे कडून स्वामीत्वधनाची रक्कम ८.१५ कोटी रूपये तसेच जमीन महसूलीची रक्कम ५.४८ कोटी अशी एकूण १३.६५ कोटी रूपयांची वसूल करण्यात आलेले आहे. या कामगिरीमध्ये प्रांत अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, तालूक्यातील सर्व तलाठी, सर्व मंडळ अधिकारी व कोतवाल यांचे योगदान उल्लेखनीय आहे.