Home क्राईम रावेर तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाची धडक कारवाई; डंपर जप्त

रावेर तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाची धडक कारवाई; डंपर जप्त


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात महसूल विभागाने धडक कारवाई करत एका डंपरला जप्त केल्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून जप्त करण्यात आलेला डंपर सावदा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील सावदा परिसरात रात्रीच्या वेळी अवैधरीत्या वाळूची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी महसूल विभागाकडे सातत्याने येत होत्या. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाच्या पथकाने कारवाईसाठी विशेष सापळा रचला. रात्री साधारण दोन वाजेच्या सुमारास पथकाने संशयित डंपरवर धडक कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.

कारवाईदरम्यान एमएच २८ एबी ७८११ क्रमांकाचा डंपर अवैधरित्या वाळू वाहतूक करताना आढळून आला. महसूल विभागाने तात्काळ हा डंपर जप्त करत पुढील कारवाईसाठी सावदा पोलीस ठाण्यात जमा केला आहे. महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाने अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे.

ही कारवाई रावेरचे तहसीलदार संजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. महसूल विभागाने अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी पुढील काळातही अशाच धडक मोहिमा राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.


Protected Content

Play sound