यावल तालुक्यात वाळू माफीयांविरूद्ध महसूलची धडक कारवाई : १२ लाखांचा दंड

0e70acc1 0b54 4479 b5d2 b16cf103ca8a

यावल( प्रतिनिधी) तालुक्यात महसुल प्रशासनाने वाळु माफीयाविरुद्ध धडक कारवाई सुरू केली असुन, प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले आणि तहसीलदार जितेन्द्र कुंवर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसांमध्ये महसुल प्रशासनाने १२ लाखांच्या वर दंड ठोठावला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

 

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार गेल्या तीन दिवसात वाळु माफीयाविरुद्ध सुरु केलेल्या धडक मोहिमेत वाळु वाहतुक करणाऱ्या पाच वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. दिनांक १७ जुन ते १९ जुनच्या दरम्यान यावल-फैजपुर मार्गावरील सांगवी बु. या गावाजवळ दोन वाहने अनधिकृतपणे वाळुची वाहतुक करतांना आढळुन आली तर काल दिनांक १८ रोजी फैजपुर शहरात एका वाहनावर डॉ. थोरबोले यांनी कारवाई केली. आज दिनांक १८ व १९ जुन रोजी तहसीलदार जितेन्द्र कुंवर यांच्या मार्गदर्शनाखाली समिर तडवी (तलाठी परसाडे), निखिल मिसाळ (तलाठी अंजाळे), एस.व्ही. सुर्यवंशी (तलाठी यावल), बी.एम. पवार, जे. डी.बंगाळे, सचिन जगताप, यांच्या पथकाने काल रात्री ८.३० च्या सुमारास वाहनचालक रतन मधुकर साबळ (रा.साकेगाव, ता. भुसावळ) हा रंगलाल परदेशी यांच्या मालकीचा ट्रकव्दारे (क्रमांक एम.एच१९; सी.वाय. ३२५५) अनधिकृतरित्या वाळुची अनधिकृत वाहतुक करतांना आढळुन आला तर आज (दि.१९) सकाळच्या सुमारास यावल-चोपडा राज्य मार्गावर फॉरेस्ट पाँईटवर एक वाहन (क्रमांक एम.एच. १९; जे.३९५१) अनधिकृतरित्या वाळु वाहतुक करतांना आढळुन आले.

या सर्व वाहनांना तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आले असुन, गेल्या दोन दिवसात पकडण्यात आलेले वाहनांवर ५ लाख ५० हजारांहून अधिक दंड आकारण्यात आला आहे. उर्वरीत तीन वाहनांकडुन सुमारे सहा लाखांच्यावर दंडाच्या वसुलीची तत्काळ नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहीती तहसीलदार जितेन्द्र कुंवर यांनी दिली. याव्यतिरिक्त आणखी काही वाळुची अनधिकृतपणे वाहतुक करणारे तस्कर महसुल विभागाच्या रडारवर असल्याचे सांगुन अनाधिकृत वाळु माफीयांना कुठल्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नसल्याचेही त्यांनी सांगीतले. दरम्यान गेल्या दोन दिवसात महसुलव्दारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे वाळु तस्करांचे धाबे दणाणले आहे.

Protected Content