यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अवैद्य गौण खनिज वाळुची बेकायद्याशीर वाहतुक होत असतांना प्रांताधिकारी कैलास कडलग व यावलच्या तहसीलदार यांच्या सुचनेवरून महसुलच्या पथकाने यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे केलेल्या कारवाई करीत ट्रॅक्टर जप्त केले आहे.
सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणारे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर नंबर एम एच १९ व्हीजी ३०४२ समाधान पाटील रा. विदगाव ता. जिल्हा जळगाव यांच्या मालकीचे रस्त्यावर आढळून आले. सदर ट्रॅक्टरचा पंचनामा करून यावल तहसील कार्यालयात जप्त करण्यात आला आहे. यावल तहसीलदार मोहन माला नाझीरकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी सापळा रचून किनगाव सर्कल एस एल पाटील, पी एल पाटील, साकळीचे मंडळ अधिकारी सचिन जगताप, डांभुर्णी तलाठी मधुराज पाटील , आडगाव तलाठी गोरटे, नायगावचे तलाठी यांच्यासह पथकाने कारवाई केली.
यावल तालुक्यात मोठया प्रमाणावर सर्रासपणे बेकायदेशीर वाळूची वाहतुक केली जात आहे. एकीकडे महसुल प्रशासनाच्या वतीने कारवाई करीत असतांना तरी देखील अवैध गौण खनिज वाहतुकीला मात्र आळा बसत नसल्याचे चित्र दिसून येत नाही. त्यासाठी महसुल विभागाने अवैध वाहतुकी विरोधात कंबर कसली असल्याचे महसुल प्रशासनाकड्डन सांगण्यात येत आहे.