जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील निवृत्ती वेतनधारकांनी त्यांना योग्य असणारा नवीन आयकर गणना किंवा जुनी आयकर गणनेचा पर्याय निवडावा असे आहवान जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण पंडित यांनी केले आहे.
आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात आयकर कायद्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. आयकर विभागाच्या करवसुलीचे नवीन सेक्शन 115 बीएसी नुसार आर्थिक वर्ष 2020-21 चा आयकर गणनेसाठी नवीन आयकर गणना आणि जुनी आयकर गणना असे दोन प्रकार ठरवण्यात आले आहेत. तरी जिल्ह्यातील निवृत्ती वेतनधारकांनी त्यांना योग्य असणारा नवीन आयकर गणना किंवा जुनी आयकर गणनेचा पर्याय निवडावा. तसेच याकरिता आवश्यकता असल्यास नजीकच्या सनदी लेखापाल यांची मदत घ्यावी. व निवडलेला पर्याय जिल्हा कोषागार कार्यालयास [email protected] या ईमेल आयडीवर आपले नाव, पीपीओ, बँकेचे नाव व खाते क्रमांकासहीत 30 सप्टेंबरपूर्वी कळविण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण पंडित यांनी केले आहे.
निवृत्ती वेतनधारकांनी निवडलेल्या गणनेनुसार देय होणारी टीडीएस वाजाती करता येईल. जे निवृत्तीधारक आयकर गणनेची निवड वेळेत कळविणार नाही, त्यांची पूर्वीप्रमाणेच जुनी आयकर गणनेनुसार टीडीएस वजाती करण्यात येईल याची निवृत्ती वेतनधारकांनी नोंद घ्यावी, असेही श्री. पंडित यांनी कळविले आहे.