जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वाघुळदे नगरातील भिकमचंद जैन नगरात बंद घराचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातून चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकुण ४९ हजार ३७० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाख्ल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कैलास गजानन कवडीवाले वय ६२ रा. भिकमचंद जैन नगर, वाघुळदे जैन, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी २६ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता ते घर बंद करून बाहेरगावी गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचे पाहून कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकुण ४९ हजार ३७० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार शनिवारी २७ जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता समोर आला. दरम्यान घरात चोरी झाल्यानंतर कैलास कवडीवाले यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ किशोर निकुंभ हे करीत आहे.