जळगाव प्रतिनिधी । भोईटे नगरात राहणाऱ्या सेवानिवृत्त प्राचार्याच्या खात्यातून पेन्शनचे ३६ हजार ७०० रूपये अज्ञात व्यक्तीने परस्पर काढून घेतल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, अशोक फकिरराव साळुंखे (वय-७४) रा. श्री. रेसीडन्सी, भाईटे नगर हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. साळुंखे हे धुळे जिल्ह्यातील कुसुंबा गावातील एम.के. शिंदे विद्यालयातून प्राचार्य पदावरून २००६ मध्ये सेवानिवृत्त झालेले आहे. त्यांची पेन्शनची रक्कम जळगाव शहरातील एसबीआयच्या मुख्य शाखेतील बँक खात्यात जमा होते. दरम्यान, गुरूवारी १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांनी व्हॉट्सॲप नंबर अज्ञात व्यक्तीने हाय करून पाठविला. त्यानंतर एपीके नावाची फाईल पाठविले. साळुंखे त्यांनी ती फाईल ओपन केली असता फाईल ओपन होवून आपोआप बंद झाली.
त्यानंतर त्यांच्या पेन्शन असलेल्या बँक खात्यातून अनुक्रमे ३ हजार ७००, २० हजार आणि १३ हजार असे एकुण ३६ हजार ७०० रूपये खात्यातून कमी झाल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने बँकेत जावून चौकशी केली असता उत्तराखंड राज्यातील एका व्यक्तीच्या खात्यात वर्ग झाल्याचे सांगितले. त्यानुसार अशोक साळुंखे यांनी गुरूवार २ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय कुमार ठाकूरवाड करीत आहे.