जळगाव प्रतिनिधी । रेल्वेस्थानक परिसरातून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मधुकर नथ्थू कोळी (वय-६८) रा. आदर्श नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबियासह राहतात. ते सेवानिवृत्त कर्मचारी आहे. अमळनेर तालुक्यातील पाडसे येथे त्यांची शेती आहे. मंगळवार १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता अमळनेर येथे जाण्यासाठी जळगाव रेल्वे स्थानक परिसरात पार्सल ऑफीस जवळ दुचकी (एमएच १९ बीवाय ४५) ने आले. दुचाकी तिथेच पार्किंग करून ते अमळनेर येथे गावाला गेले. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता जळगावात आल्यानंतर त्यांना त्यांची पार्किंग केलेली दुचाकी मिळून आली नाही. परिसरात शोधाशोध केली तरीही मिळाली नाही. दरम्यान शोधाशोध करून दुचाकी मिळाली नसल्याने अखेर गुरूवार १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मधूकर कोळी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ योगेश बोरसे करीत आहे.