पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा तालुक्यातील तलाठी मंडळ अधिकारी व कायलयीन कर्मचारी यांच्यासाठी महसूल विषय कायदे व नवीन सुधारणाबाबत प्रशिक्षणाचे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांचे व्याख्यान मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणासाठी उपस्थिताना कुंडेटकर यांनी 7/12 वाचन, नोंद करण्याची पद्धत, आदिवासी खातेदार यांच्या जमीन हस्तांतरण, मृत्यूपत्र कार्यपद्धती, हिंदू वारसा कायदा, नवीन शर्त जमीन 16 प्रकार व शर्त भंग, कुळ कायद्याच्या विविध आवश्यक तरतुदी, विविध उच्च न्यायालय संदर्भ व दाखले यावर मार्गदर्शन केले.
कुंडेटकर हे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी असून संपूर्ण महाराष्ट्रात महसूल अधिकारी कर्मचारी व शेतकरी यांना विनामूल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून कायदेशीर माहिती प्रसारित करण्याचे कामकाज करीत असतात. जे जे आपणासी दावे इतरांशी सांगावे या उक्ती प्रमाणे ते ज्ञान दानाचे महान कार्य सेवा निवृत्ती नंतर देखील करीत आहेत. यात कुंडेटकर यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन शंका समाधान केले. प्रशिक्षणाचा फायदा आम्हाला निश्चित होईल अशी अपेक्षा सर्व संबंधित यांनी व्यक्त केली असून सदर या प्रशिक्षणाचा परिपूर्ण आम्ही लाभ घेऊ असे आश्वासन महसूल विभागातील कर्मचारी यांनी कुंडेटकर यांना आश्वासन दिले. पारोळा येथील तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.