पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । संपूर्ण देशात अखिल भारतीय बीएसएनएलच्या सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेतर्फे आज विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी पाचोरा व भडगाव बीएसएनएल सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे पाचोरा येथील कार्यालयासमोर सकाळी साडेदहा वाजता संघटनेचे अध्यक्ष एम.एस.पाटील, सचिव पी.एस.संदनशिव यांचे नेतृत्वाखाली तासभर धरणे आंदोलन झाले. यात दि. १ जानेवारी २०१७ पासून १५ टक्के वेतनवाढ, दि. १ एप्रिल २०२२ पासून पेन्शन वाढ, पेन्शन महागाई भत्ता मिळण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी अशोक शिंदे, पांडुरंग धनवडे, अनिल बावचे, सुनिल अहिरे, रविंद्र पाटील, आत्माराम पाटील, भिमसिंग पाटील, लक्ष्मीकांत कुळकर्णी, संतोष वाघ, चिराग उद्धीन उपस्थित होते.