मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | सध्या उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात खरीप पुर्व कपाशीची लागवड सुरू आहे. यात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने आज रोहिणी ताई खडसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
सध्या खरीप पुर्व हंगामात कपाशीची लागवड सुरू आहे. त्यात विद्युत वितरण कंपनीच्या तांत्रिक कारणांमुळे किंवा चुकांमुळे शेतकऱ्यांना कृषी पंपास विद्युत पुरवठा योग्य वेळी व योग्य दाबाने होत नाही. विद्युत डीपी जळाल्यास लवकर नविन डीपी देखील बसवल्या जात नाही. कमी दाबाने विद्युत पुरवठा होतो. त्यामुळे शेत पंप चालत नाही. या विविध समस्यांचा पाढा शेतकऱ्यांनी रोहिणी खडसे यांच्या उपस्थितीत कार्यकारी अभियंता ब्रिजेश गुप्ता यांच्या समोर मांडला. यावर रोहिणी खडसे यांनी रुद्रावतार धारण करत विद्युत वितरण कंपनी च्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरले व शेतकरी बांधवांच्या समस्या निकाली काढण्याची मागणी केली. यावर कार्यकारी अभियंता ब्रिजेश गुप्ता यांनी निमखेडी येथील डीपी उद्याच लावण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच इतर प्रश्न सुद्धा लवकरात लवकर सोडविण्यात येतील असे सांगितले.
यावेळी विद्युत वितरण कंपनी चे अभियंता स्वामी ढोले, प्रविण पाटील, बापू ससाणे, प्रदिप साळुंखे, बबलू सापधरे, संजय कोळी, चेतन राजपूत, रउफ खान, भैय्या पाटील, हाशम शहा, मुश्ताक भाई, फिरोज भाई, योगेश पाटील, पांडुरंग नाफडे आदी उपस्थित होते.