धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेना-काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार निलेश सुरेश चौधरी यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅलीला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शहराचे आराध्य दैवत बालाजी महाराज मंदिरावर पूजन करून भव्य रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीचे नेतृत्व काँग्रेस प्रदेश सचिव डी जी पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, पी एम पाटील सर, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, गटनेते पप्पू भावे, काँग्रेसचे शहर प्रमुख राजेंद्र न्हायदे, कॉग्रेसचे चंदन पाटील, उद्योगपती जीवन अप्प्पा बयस, माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ, प्रभारी नगराध्यक्ष अंजली विसावे, लिलाबाई चौधरी, शिवसेना उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, तालुका प्रमुख गजानन नाना पाटील , वासूभाऊ चौधरी, विजूभाऊ महाजन, विलास महाजन, राजेंद्र महाजन, संतोष महाजन,योगेश वाघ, जीवन बयास, राजेंद्र ठाकरे,सुनील चौधरी, सभापती अनिल पाटील, पंचायत समिती सदस्य प्रेमराज पाटील, मुकूंद नंनवरे, प्रेमराज पाटील (बाभोरी) आसाराम पाटील, काँग्रेस चे राजेंद्र न्हायदे, रतीलाल नाना चौधरी , अंजली भानुदास विसावे यांच्यासह सर्व शिवसेना युवासेना ,काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. तर प्रचार रॅलीच्या समाप्तीनंतर प्रचार कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.