केंद्र शासनाच्या आयुष्यमान भव कार्यक्रमाचे आयोजन
यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाँ.मनिषा महाजन यांच्या संकल्पनेतून व जिल्हा आरोग्य अधिकारी डाँ.सचिन भायेकर, तालुका आरोग्य अधिकारी डाँ.राजू तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी आयुष्यमान भव अंतर्गत भव्य आरोग्य तपासणी मेळाव्यास ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
सदरच्या आरोग्य तपासणी मेळाव्याचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव येथे करण्यात आले होते या आरोग्य मेळाव्यात किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व उपकेंद्रातील एकूण ३९६७ नागरीकांची आरोग्याची तपासणी करण्यात आली. या आरोग्य मेळाव्याला चोपडा विधानसभेच्या आमदार लता सोनवणे यांनी भेट दिली, तर तालुका आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
या आरोग्य मेळाव्यात सर्व तपासण्या मोफत असल्यामुळे हजारो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यात १२७० सामान्य रुग्ण (Genral surgon) १८ लहान बालके तपासणी ३१५, कुपोषित बालकांची तपासणी ३८, गरोदर मातांची तपासणी १५२, गर्भपिशवीच्या मुखाची तपासणी ५०, स्तन कॅन्सरची तपासणी ३८, नेत्र चिकित्सक तपासणी ६५५, genral physician ८९०, अस्थिरोग तपासणी ५२, फिजिओथेरपी तपासणी १४४, मानसोपचार तपासणी ५३, त्वचारोग तपासणी २१४, नाक, कान व घसा तपासणी ७८ , दंत रोग तपासणी ४४ व २२ इतर रुग्ण तपासण्या करण्यात आल्या. तसेच यावेळी रक्तदान शिबिरही घेण्यात आले. या शिबिरात ३२ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाला रक्तदानाचा संदेश दिला आणि म्हणून त्यांना ५० हजार रूपयांचा विमा तात्काळ देण्यात आला तर या आरोग्य तपासणी कार्यक्रमांतर्गत २७ आभा कार्ड काढण्यात आले. यावेळी ५ नागरीकांनी अवयवदानाची नोंदणीही केली. अशाप्रकारे या आरोग्य तपासणी मेळाव्या मध्ये पारिसरातील एकूण ३९६७ नागरीकांनीआरोग्य तपासणी चा लाभ घेतला.
या आरोग्य तपासणी मेळाव्या साठी अग्निशामक दल तसेच फिरते शौचालय नगरपरिषद यावल यांच्याकडून ग्रामस्थांच्या सोयीसाठी व्यवस्था केलेली होती. यावल तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र येथील समुदाय आरोग्य अधिकारी औषधी निर्माता, आरोग्य सहाय्यक आरोग्य सहायिका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच किनगाव येथील स्वयंसेवक आणि गावातील फार्मासिस्ट संघटना यांनी औषधे आणि स्वतः उपस्थित राहून हा आरोग्य तपासणी मेळावा यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य दिले. तसेच तालुका क्षयरोग व कुष्ठरोग डाँ. तायडे निरामय हॉस्पिटलचे डॉ.देशपांडे, बालरोग तज्ञ डॉ.प्रशांत जावळे, डॉ.दीपक चौधरी, दंतरोग तज्ञ डॉ.स्नेहल जावळे, डॉ.वराडे जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम टीम, डॉ. दौलत निमसे गोदावरी हॉस्पिटलचे सर्व विभागाचे डॉ.चांडक हॉस्पिटलचे डॉ. निलेश चांडक कांताई नेत्रालय, रेडक्रॉस सोसायटी यांच्यासह पियुष हॉस्पिटलचे डॉ. रोहन पाटील, रजनिगंधा हाँस्पिटलचे अस्थीरोग तज्ञ डॉ.अभिजित पाटील, कॅन्सर तज्ञ डॉ.प्रशांत चोपडा, डॉ.सागर पाटील, डॉ.प्रफुल काबरा, जनरल फिजिशियन डॉ.सुनिल सुर्यवंशी, बालरोग तज्ञ डॉ.हेमंत पाटील, यांनी तपासण्या केल्या.
या साठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन डॉ. तरांनुम शेख, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अश्फाक शेख डॉ.वकार शेख, डाँ.मोहसीन शेख, डाँ.धनंजय जोशी, डाँ.सोनल भंगाळे आरोग्य सहायिका मंगला सोनवणे, आरोग्य सहायक सुरवाडे, लिपिक जावेद जमादार आरोग्य सेविका कविता सपकाळे, मोहिनी धांडे, आफरीन तडवी, शीला जमरा,नवादी बारेला, सुजाता सोनवणे आरोग्य सेवक दिपांकर बर्डे, जे.के.सोनवणे, मनोज बारेला, पवन काळे, शिपाई सरदार कानाशा, कु.पियुष बैरागी, वाहन चालक कुर्बान तडवी, सफाई कर्मचारी गोपी सपकाळे, स्वयंसेवक मिलिंद जंजाळे, आरोग्य केंद्रातील सर्व आशा वर्कर्स वअंगणवाडी सेविका यांचे विशेष सहकार्य लाभले.