अमळनेर (प्रतिनिधी) सदगुरु जोग महाराज प्रासादीक वारकरी शिक्षण चेरिटेबल ट्रस्टव्दारा आयोजित भागवत धर्म प्रचार वारकरी बाल संस्कार शिबिर दि. ७ ते २८ मेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर श्री नचिकेता विश्वविद्यालय, छापरा रोड, नवसारी (गुजरात) येथे भव्य स्वरुपात घेण्यात येत आहे.
आजच्या काळात मुलांना संस्कार देणे, ही मोठी सामाजिक गरज आहे या ठिकाणी मुलांना हरिपाठ तथा पावल्या, गितापाठ (अध्याय ९-१२-१५ वा) विष्णु सहस्ञनाम संहिता देणे, तथा पाठ करुन घेणे, वारकरी भजन तथा शास्ञीय संगिताचे मार्गदर्शन व पखवाज शिक्षण व सर्व सकल संताच्या चरीञाबद्दल मार्गदर्शन अशाप्रकारे मुलांना शिकवण्यात येत आहे. त्यासाठी आळंदीकर महाराज मंडळीची उपस्थिती हया ठिकाणी लाभलेली आहे. ह.भ.प. विशाल महाराज इंगळे आळंदीकर, ह.भ.प. रवि महाराज मोरे आळंदीकर, ह.भ.प. यग्नेश महाराज माळी आळंदीकर, ह.भ.प. विजयजी महाराज जाधव आळंदीकर (नवसारी), ह.भ. प. सौ. संध़्याताई माळी सुरतकर (गुजरात) यांचे मार्गदर्शन येथे मुलांना लाभत आहे.