जळगाव, प्रतिनिधी | के.सी.ई.सोसायटीच्या इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च येथे दरवर्षी विदयापीठ परिक्षांमध्ये यशस्वी विदयार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला जातो. यावर्षी १० ऑगस्ट रोजी हा गुणगौरव सोहळा विदयार्थी आणि पालकांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.
या गुणगौरव सोहळयासाठी व्यासपीठावर के.सी.ई.सोसायटीचे अकॅडेमीक डायरेक्टर प्रा.डॉ. डी.जी हुंडीवाले, प्रा.डॉ. शिल्पा बेंडाळे, एमबीए विभागप्रमुख डॉ.विशाल संदानशिवे, बीएमएस विभागप्रमुख योगेष पाटील, विदयापीठ गोल्ड मेडालिस्ट माजी विदयार्थीनी निधी कोठारी उपस्थित होते.गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून इतर विदयाथ्र्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा आदर्श घेउन यश संपादन करावे. पालकांनीही आपल्या पाल्यांवर योग्य ते लक्ष दयावे जेणेकरून संस्था आणि पालक हया दोघांचे विदयार्थी विकासाचे एकमेव उद्दीष्ट साध्य होणे सहज सुलभ होईल असे प्रतिपादन आपल्या प्रास्ताविकात प्रा डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी केले. प्रा. डॉ. डी. जी. हुंडीवाले यांनी विद्यार्थ्यांना संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती करून दिली. यशस्वी करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने सजग राहून अभ्यास केला पाहिजे याचे मार्गदर्शन केले. माजी विदयार्थीनी व विदयापीठ गोल्ड मेडालीस्ट निधी कोठारी हिने आपल्या आजपर्यंतच्या वाटचालीत संस्थेचा वाटा खूप मोठा असल्याचे म्हटले. इथल्या संचालिका आणि शिक्षकांच्या मार्ग्दशानामुळे आपली आजची ओळख निर्माण झाल्याचे तिने आवर्जुन नमूद केले.पालक आणि विद्यार्थ्यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. आयएमआरमध्ये आमच्या पाल्यांना शिक्षक नव्हे तर शिक्षकाच्या रूपाने पालक मिळाले आणि आमच्या मुलांच्या आयुष्यात अभ्यासासोबत योग्य ती शिस्त निर्माण करण्याचे काम सहज साध्य झाले असे प्रतिपादन पालकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.यावेळी रिया थोरानी, दिपेषा लोढा, नेहा तळेले, हरिश निकंभ या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सु़त्रसंचालन प्रा. दिपाली पाटील यांनी तर आभार प्रा. योगेश पाटील यांनी मानले.