यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कर्तव्यनिष्ठ कार्यतत्पर सर्व सामान्यांच्या कार्यासाठी प्रशासकीय पातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी सेवा भावीवृत्तीने हसतमुखाने सदैव अग्रस्थानी राहणारे यावलच्या तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार आर के पवार हे आपल्या ३६ वर्षाच्या प्रर्दीघ शासकीय सेवेतून उद्या सेवानिवृत्त होत आहे.
यावल तहसील कार्यालयात कार्यरत असलेले निवासी नायब तहसीलदार आर के पवार मुळ राहणारे आभोडे खु॥ तालुका रावेर यांचे प्राथमिक शिक्षण पाल आणी सरदार जी जी हायस्कुल रावेर व माध्यमिक शिक्षण जळगाव येथे नुतन मराठा कॉलेज व वसंतराव नाईक कॉलेज औरंगाबाद येथे झाले.
दिनांक १ जानेवारी १९८६ वर्षात त्यांची तलाठी म्हणून पाचोरा येथून सुरुवात झाली. त्या नंतर त्यांनी तलाठी म्हणुन १९८९ ते १९९५ पर्यंत खिरोदा तालुका रावेर, १९९५ ते १९९७ या वर्षात सावदा तालुका रावेर, १९९७ ते २००१ निंबोल ता. रावेर, २००१ ते २००२ मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी व २००३ते २००५ पर्यंत सतत पाच वर्ष त्यांनी रावेर शहर तलाठी पदावर शासकीय सेवा बजावली याच कार्यकाळात त्यांना विजयकुमार गावीत जिल्ह्याचे हे पालकमंत्री असतांना त्यांच्या हस्ते आदर्श तलाठी पुरस्काराने सन्मान मिळाले.
यानंतर ते २००८ ते २०११ या कालावधीत त्यांनी फैजपुर शहर तालुका यावल येथे तलाठी पदाचे कार्य सांभाळले , पुनश्च त्यांनी २०१२या वर्षात ऐनपुर तालुका रावेर येथे सेवा बजावली , २०१२याच वर्षात त्यांना मंडळ अधिकारी या पदावर पदोन्नती मिळाल्याने त्यांनी २०१२ते १३या काळात नाडगाव तालुका मुक्ताईनगर येथे सेवा बजावली. २०१३ ते १७ या काळात त्यांनी खानापुर तालुका रावेर येथे सेवाकार्य केले.
भुसावळ येथे २०१८ पर्यत पदोन्नतीवर त्यांनी तालुका करमणुककर अधिकारी म्हणुन सेवेत कार्य केले. यावल येथे श्री व्यास महाराज यांच्या तपोभुमीवर व मनुमातेच्या कशीत पदोन्नतीवर त्यांनी निवासी नायब तहसीलदार या पदावर दिनांक २०१९ ते ३१ / ५ / २०२२पर्यंत त्यांनी चार वर्ष उत्कृष्ठ अशी प्रशासकीय सेवा बजावली असून शासकीय सेवापूर्ती नंतरचे आपले पुढील आयुष्य आपण आपल्या जन्मभुमीत असलेल्या आभोडे गावात शेती व कुटुंबा सोबत घालविणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
२०२०ते २१ या दोन वर्षाच्या कोरोना संसर्गाच्या अतिशय धोकादायक काळात नागरीकांची सेवा करणारे एक उत्कृष्ठ सेवाभावी अधिकारी म्हणुन आर के पवार यांनी लक्ष वेधणारे उल्लेखनिय कार्य करून नांवलौकीक मिळवला.