Home Cities पारोळा पारोळा तालुक्यात २१ एप्रिलला सरपंच पदाची आरक्षण सोडत

पारोळा तालुक्यात २१ एप्रिलला सरपंच पदाची आरक्षण सोडत


पारोळा- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पारोळा तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षणासाठीची सोडत २१ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पारोळा तहसील कार्यालयातील मीटिंग हॉलमध्ये पार पडणार आहे. या सोडतीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अनिल पाटील असतील.

या प्रक्रियेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित केले जाईल. यानंतर दुपारी दोन वाजता, उपविभागीय महसूल अधिकारी मनीष कुमार गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली या आरक्षणातून महिला आरक्षण सोडतीद्वारे ठरवण्यात येणार आहे.

तहसीलदार अनिल पाटील यांनी सर्व ग्रामपंचायत सरपंच, सदस्य तसेच राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि संबंधितांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.


Protected Content

Play sound