जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी १९ प्रभागांतील ७५ जागांसाठीची आरक्षण सोडत मंगळवारी पारदर्शक पद्धतीने जाहीर करण्यात आली. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोडतीवेळी उमेदवार आणि समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. या सोडतीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि महिलांसह सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण निश्चित करण्यात आले.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी “ईश्वर चिठ्ठी” काढून आरक्षण सोडत पारदर्शकतेने पूर्ण करण्यात आली. प्रशासनाने आरक्षण प्रक्रिया व्हिडिओ रेकॉर्डिंगसह पार पाडली. या सोडतीनंतर शहरातील सर्व १९ प्रभागांसाठी चार-चार जागांचे आरक्षण निश्चित झाले असून, राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सोडतीनुसार —
प्रभाग १ मध्ये (अ) अनुसूचित जाती महिला, (ब) नागरिकांचा मागासवर्ग, (क) सर्वसाधारण महिला, (ड) सर्वसाधारण आरक्षण.
प्रभाग २ मध्ये (अ) अनुसूचित जमाती, (ब) नागरिकांचा मागासवर्ग महिला, (क) सर्वसाधारण महिला, (ड) सर्वसाधारण.
प्रभाग ३ मध्ये (अ) अनुसूचित जाती महिला, (ब) अनुसूचित जमाती महिला, (क) नागरिकांचा मागासवर्ग, (ड) सर्वसाधारण.
प्रभाग ४ मध्ये (अ) अनुसूचित जाती महिला, (ब) नागरिकांचा मागासवर्ग, (क) सर्वसाधारण महिला, (ड) सर्वसाधारण.
प्रभाग ५ मध्ये (अ) नागरिकांचा मागासवर्ग, (ब, क) सर्वसाधारण महिला, (ड) सर्वसाधारण.
प्रभाग ६ मध्ये (अ) नागरिकांचा मागासवर्ग महिला, (ब) सर्वसाधारण महिला, (क, ड) सर्वसाधारण.
प्रभाग ७ मध्ये (अ) नागरिकांचा मागासवर्ग महिला, (ब) सर्वसाधारण महिला, (क, ड) सर्वसाधारण.
प्रभाग ८ मध्ये (अ) नागरिकांचा मागासवर्ग, (ब, क) सर्वसाधारण महिला, (ड) सर्वसाधारण.
प्रभाग ९ मध्ये (अ) नागरिकांचा मागासवर्ग महिला, (ब) सर्वसाधारण महिला, (क, ड) सर्वसाधारण.
प्रभाग १० मध्ये (अ) अनुसूचित जाती, (ब) नागरिकांचा मागासवर्ग महिला, (क) सर्वसाधारण महिला, (ड) सर्वसाधारण.
प्रभाग ११ मध्ये (अ) अनुसूचित जमाती महिला, (ब) नागरिकांचा मागासवर्ग, (क) सर्वसाधारण महिला, (ड) सर्वसाधारण.
प्रभाग १२ मध्ये (अ) अनुसूचित जाती, (ब) नागरिकांचा मागासवर्ग, (क) सर्वसाधारण महिला, (ड) सर्वसाधारण.
प्रभाग १३ मध्ये (अ) नागरिकांचा मागासवर्ग, (ब, क) सर्वसाधारण महिला, (ड) सर्वसाधारण.
प्रभाग १४ मध्ये (अ) नागरिकांचा मागासवर्ग, (ब, क) सर्वसाधारण महिला, (ड) सर्वसाधारण.
प्रभाग १५ मध्ये (अ) नागरिकांचा मागासवर्ग महिला, (ब) सर्वसाधारण महिला, (क, ड) सर्वसाधारण.
प्रभाग १६ मध्ये (अ) नागरिकांचा मागासवर्ग, (ब, क) सर्वसाधारण महिला, (ड) सर्वसाधारण.
प्रभाग १७ मध्ये (अ) नागरिकांचा मागासवर्ग महिला, (ब) सर्वसाधारण महिला, (क, ड) सर्वसाधारण.
प्रभाग १८ मध्ये (अ) अनुसूचित जमाती, (ब) नागरिकांचा मागासवर्ग महिला, (क) सर्वसाधारण महिला, (ड) सर्वसाधारण.
प्रभाग १९ मध्ये (अ) नागरिकांचा मागासवर्ग महिला, (ब) नागरिकांचा मागासवर्ग, (क) सर्वसाधारण महिला, (ड) सर्वसाधारण.
सोडतीदरम्यान सभागृहात उमेदवार आणि पक्षांच्या प्रतिनिधींच्या चेहऱ्यांवर उत्सुकतेसोबतच ताणही दिसून आला. काही प्रभागांमधील आरक्षणात बदल झाल्याने अनेक संभाव्य उमेदवारांचे राजकीय गणित बदलले असून, पुढील काही दिवसांत पक्षांतर्गत हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर जळगाव शहरात राजकीय चर्चा अधिक रंगू लागल्या आहेत. कोणत्या पक्षाचे उमेदवार कोणत्या प्रभागात उतरतील, कोणाला आरक्षणाचा फायदा मिळेल, या विषयांवर आता मतदारांत उत्सुकता आहे. प्रशासनाने आरक्षण प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पूर्ण केल्याबद्दल सर्व स्तरांवरून समाधान व्यक्त केले जात आहे.
जळगाव महापालिकेच्या आरक्षण सोडतीमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून, निवडणुकीची रणधुमाळी आता औपचारिकपणे सुरू झाल्याचे चित्र आहे.



