पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येत्या काळात होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीसाठी आज प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले.
पाचोरा नगरपरिषद पाचोरा सार्वत्रिक निवडणूक – २०२२ आरक्षण सोडत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाचे आदेशानुसार आज दि. २८ जुलै २०२२ रोजी दुपारी ३ वाजता नगरपरिषद सभागृह येथे आयोजीत करण्यात आला. यात एकूण १४ प्रभागांमधून २८ सदस्य संख्या यापुर्वीच निश्चीती झालेली होती. त्याअन्वये दि. १३ जुन २०२२ रोजी अनुसुचीत जाती, अनुसुचीत जाती (महिला), अनुसुचीत जमाती, अनुसुचीत जमाती (महिला) करीताचे आरक्षण निश्चीत करण्यात आलेले होते. आज दि. २८ जुलै रोजी नागरीकांचा मागासप्रवर्ग, नागरीकांचा मागासप्रवर्ग (महिला), महिला व सर्वसाधारण प्रवर्गाकरीता खालील प्रमाणे आरक्षण सोडत काढण्यात आली.
दरम्यान, आजच्या सोडतीत प्रभाग क्रं. ८ (अ), १३ (अ) व १४ (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग तर प्रभाग क्रं. ३ (अ), ४ (अ), ५ (अ) व ९ (अ) हे प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) राखीव झाले आहे. या सोडती प्रसंगी पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल हे होते. तर तहसिलदार कैलास चावडे, न. पा. मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर, उपमुख्याधिकारी डी. एस. मराठे, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, उद्योजक मुकुंद बिल्दीकर, प्रा. गणेश पाटील, किशोर बारावकर, दत्ता जडे, अजहर खान, प्रविण ब्राम्हणे, समाधान मुळे, गोविंद शेलार, शाकीर बागवान, सईस शेख उपस्थित होते.
या प्रमाणे असणार आहे प्रभागांचे आरक्षण –
प्रभाग क्रमांक १ (अ) अनुसूचित जाती (महिला), प्रभाग क्रं. १ (ब) – सर्वसाधारण, प्रभाग क्रं. २ (अ) – अनुसूचित जाती (महिला), प्रभाग क्रं. २ ( ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रं. ३ (अ) – नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला), प्रभाग क्रं. ३ (ब) – सर्वसाधारण, प्रभाग क्रं. ४ (अ) – नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला), प्रभाग क्रं. ४ (ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रं. ५ (अ) – नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला), प्रभाग क्रं. ५ (ब) – सर्वसाधारण, प्रभाग क्रं.६ (अ) – अनुसूचित जमाती, प्रभाग क्रं. ६ (ब) सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रं. ७ (अ) अनुसूचित जाती, प्रभाग क्रं. ७ (ब) – सर्वसाधारण (महिला ), प्रभाग क्रं. ८ (अ) – नागरिकांचा मागासप्रवर्ग, प्रभाग क्रं. ८ (ब) – सर्वसाधारण ( महिला ), प्रभाग क्रं. ९ (अ) – नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला), प्रभाग क्रं. ९ (ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रं. १० (अ) सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्रं. १० (ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रं. ११ (अ) – सर्वसाधारण (महिला ), प्रभाग क्रं. ११ (ब) – सर्वसाधारण, प्रभाग क्रं. १२ (अ) – सर्वसाधारण (महिला ), प्रभाग क्रं. १२ (ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रं. १३ (अ) – नागरिकांचा मागासप्रवर्ग, प्रभाग क्रं. १३ (ब) सर्वसाधारण ( महिला ), प्रभाग क्रं. १४ (अ) – नागरिकांचा मागासप्रवर्ग, प्रभाग क्रं. १४ (ब) – सर्वसाधारण (महिला) या प्रमाणे आरक्षण जाहिर झाले आहे
सदर आरक्षण सोडतीवर हरकती व सुचना दि. २९ जुलै २०२२ ते १ ऑगस्ट २०२२ पावेतो मागविण्याचा कालावधी आहे. या आरक्षण सोडतीकरीता गो. से. हायस्कूल मधील इयत्ता ८ वी चे विद्यार्थी चि. भार्गव राजेंद्र मानकरे व कु. वैष्णवी गोपाल पवार या विद्यार्थ्यांच्या हस्ते सर्वांसमोर चिठ्ठी काढण्यात आली. या प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले व सदर प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे व राज्य निवडणूक आयोगाचे निर्देशांन्वये पुर्ण करण्यात आली. आरक्षण सोडत प्रसंगी संगणक अभियंता मंगेश माने, विधी अधिकारी भारती निकुंभ, लिपीक विशाल दिक्षीत, लिपीक ललित सोनार, किशोर मराठे सह अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी उपस्थितांचे आभार मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांनी मानले.