भुसावळ प्रतिनिधी । येथील नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरात डेंग्यु प्रतिबंधासाठी यंत्रसामुग्री उपलब्ध व्हावी, तसेच शहरातील गटारी व कचरा कुंडीच्या ठिकाणी वेळोवेळी औषधीची फवारणी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन जागतिक लोकधिकार जन जागरण मंचातर्फे मुख्याधिकारी यांना करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड.अभिजीत मेने यांनी सांगितले की, शहरात सद्या डेंग्यु या जीव घेणा-या आजाराने थैमान घातले असून या आजारामुळे काही लोकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील गटारी व कचराकुंडया नियमीतपणे स्वच्छ होत नसल्याने या ठिकाणी डेंग्यु सारख्या डासांची उत्पत्ती मोठया प्रमाणात होत आहे. यामुळे येथील नागारीकाचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासाठी परिसरात वेळोवेळी औषध फवारणी करण्यात यावी, कामी लागणारी औषधी, पावडर व यंत्र सामुग्री उपलब्ध करुन देण्यात यावी. तसेच या औषधी पावडरचे व फवारणी करणा-या व्यक्तीची रोजंदारीचा खर्च आमची संस्था करण्यास तयार आहे. मात्र, फवारणी न झाल्यास अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन त्यांना डेंग्युची आजाराची लागण होण्याची शक्यता आहे व वेळ प्रसंगी जिवीत हानी होण्याची देखील दाट शक्यता आहे व असे काही झाल्यास प्रशासन पुर्णतः जबाबदार राहिल याची नोंद घ्यावी, असा इशारा देखील मागणी निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.