Home धर्म-समाज पाचोरा येथील शिंदे माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात

पाचोरा येथील शिंदे माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात


पाचोरा, प्रतिनिधी । येथील कै. पि. के. शिंदे माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंडित शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

कार्यक्रमास प्रमुख उपस्थितांमध्ये गिरणाई शिक्षण संस्थेचे सचिव अॅड. जे. डी. काटकर हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एस. व्ही. गीते यांनी केले. व्ही. पी. देशमुख यांनी गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. आर. कोतकर यांनी केले. सदर कार्यक्रमात गुणवत्ता यादीत चमकणाऱ्या सन २०२० – २१ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता ५ वी च्या ११ तर इयत्ता ८ वी च्या ८ विद्यार्थ्यांना तसेच मार्गदर्शन करणाऱ्या सुशिल महाजन यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले.  उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक सु. ना. पाटील यांनी मानले. कार्यक्रमाप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound