पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | केंद्र सरकारने नुकतेच लागु केलेल्या “हिट अँड रन” कायद्या अंतर्गत दोषी आढळल्यास १० वर्षांची शिक्षा व ५ लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. सदर कायद्याविरोधात पाचोरा येथे जय संघर्ष चालक मालक संघटना रस्त्यावर उतरून प्रदेश अध्यक्ष प्रविण वाघ यांच्या नेतृत्वाखाली शहरातील जारगाव चौफुलीवरुन थेट तहसिल कार्यालयापर्यंत लागु करण्यात आलेल्या “हिट अँड रन” कायद्याच्या निषेधार्थ भव्य अशी रॅली काढण्यात आली.
याप्रसंगी जय संघर्ष चालक मालक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रविण वाघ, खानदेश सहकार्य अध्यक्ष योगेश पवार, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, बस विभाग उत्तम बोरसे, शहर अध्यक्ष दिपक पवार, वैभव पाटील, शेख शाकीर शेख रशिद, संजय खेडेकर, मंगेश पाटील, विजय सोनवणे, शांताराम वाघ, गजानन पोतदार, संदिप सपकाळे, विनोद सुर्यवंशी, राजेंद्र अहिरे, मिलिंद पगारे, जितेंद्र जाधव, ईश्वर राठोड, प्रशांत धनगर, शामिर खान मुसा तडवी, वसीम पठाण, गणेश पाटील यांचेसह जय संघर्ष चालक मालक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निषेधास पाचोरा येथील एकता ऑटो रिक्षा चालक मालक युनियन तर्फे एकता ऑटो रिक्षा चालक मालक युनियनचे उपाध्यक्ष सुनिल शिंदे, सहसचिव अनिल लोंढे यांनी जाहिर पाठिंबा देण्यात आला आहे.
अपघात घडल्यास जखमींना मृत्युच्या दारी सोडून पळून जाणे हे प्रत्येक मानवी मनाला पटण्यासारखे मुळीच नाही. परंतु स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड करणे हा गुण प्रत्येक प्राणी मात्रा मध्ये जन्म जात असल्या कारणाने आणि आपल्या भारत देशा मध्ये दलित आणि आदिवासी यांच्यासाठी जशी कठोर कायद्याची तरतूद आहे. अशा एखाद्या कठोर कायद्याचे संरक्षण ड्रायव्हरला नसल्या कारणाने ड्रायव्हर हा केवळ स्वतःच्या जिवाच्या भितीने अपघात स्थळावरून पलायन करतो.
ड्रायव्हर सुरक्षा कायद्याची प्रथमतः अंमलबजावणी करणे आणि त्यानंतर “हिट अँड रन” या कायद्या मध्ये कारावासाचा कालावधी व आर्थिक दंड यामध्ये कमतरता करुन त्या नंतरच कायदा लागू करण्यात यावा. अशा आषयाचे निवेदन जय संघर्ष चालक मालक संघटनेतर्फे तहसिलदार यांना देण्यात आले. सदरचे निवेदन निवासी नायब तहसीलदार संभाजी पाटील यांनी स्विकारले