लक्ष्मीनगरातून दोन मोबाइल लांबविले; शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील लक्ष्मीनगरातील पार्टीशनच्याघरातून अज्ञात चोरट्यांनी २० हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सविस्तर माहिती अशी की, लक्ष्मीनगरात विकास सुभाष मोरे यांच्या भाडेकरारावरील पार्टीशनच्या दोन खोल्या घेतल्या आहेत. यात एका खोलीत रोहन भिमराव चव्हाण हा तरुण आई, वडील या कुटुंबासह वास्तव्यास आहे. तर दुसर्‍या खोलीत रोहनचे काका, काकू व चुलत भाऊ अंकित चव्हाण हे कुटुंब वास्तव्यास आहेत. रोहन व अंकित हे दोन्ही एमआयडीसीतील कामाला आहे. रोहनचे वडील व काका हमाली काम करतात. रोहन व अंकित या दोघांनी काही दिवसांपूर्वी ९ हजार ५०० रुपयांचा एक व १० हजार ५०० रुपयांचा एक असे २० हजार रुपयांचे दोन मोबाईल खरेदी केले होते.  १२ जून रोजी पार्टीशनच्या घराच्या समोरील खोलीत रोहन व अंकित हे दोघे आपआपले मोबाईल उशाशी ठेवून झोपले होते. पहाटे चार वाजेच्या सुमारास रोहन यास जाग आली असता, घराचा दरवाजा उघडा दिसला. त्याने अंकितलाही उठविले. दोघांनी उशाशी ठेवलेले मोबाईल दिसून आले नाही. पार्टीशनचे घर असल्याने लाकडी फटीतून चोरट्याने हात घालून आतून लावलेली कडी उघडून घरात प्रवेश केला व मोबाई लांबविल्याची खात्री झाल्यावर रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास रोहन याने तक्रारीसाठी पोलीस स्टेशन गाठले. रोहन चव्हाण याच्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात २० हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल लांबविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय निकुंभ हे करीत आहेत.

 

Protected Content