जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील खाजगी व शासकीय मालमत्तेवरील विना परवानगी काही राजकीय पक्षाचे झेंडे, बॅनर, जहिराती लावलेले आहे. या जाहिराती लावणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिका आयुक्त विदया गायकवाड यांना दिले. भारतीय जनता पार्टी या राजकीय पक्षाच्या झेंडे व बॅनर यांच्या स्वरूपात लागलेल्या जाहिराती शहरातील खाजगी व शासकीय मालमत्तेवर लागलेल्या आहे.
कमळ हे चिन्ह दाखवून जाहिरातबाजी करण्यात येत आहे. जाहिरातीची शासकीय फी देणे प्रत्येक पक्षाला बंधनकारक असते परंतू शहरातील प्रत्येक भागात खाजगी व मालमत्तेवर मनपाची परवानगी न घेता राजकीय प्रचार-प्रसार करण्यात आलेला दिसून येते आहे. शहरातील अनेक भिंतीवर भारतीय जनता पक्षाच्या चिन्हाचे रंगवण्यात आले आहे. सदर पक्षावर गुन्हा दाखल करावा आणि राजकीय पक्षाचे चिन्ह लवकरात लवकर हटवण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने केली आहे.
मनपा आयूक्त विदया गायकवाड यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, किरण राजपूत, हितेश जावळे, भाऊराव इंगळे यांच्या व्दारे निवेदन देण्यात आले