जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी : आकाशवाणी चौकापासून महाबळ चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. हे अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन इ मेलद्वारे आयुक्तांना देण्यात आले आहे.

निवेदनात पृथ्वीराज सोनवणे यांनी तक्रार केली आहे की, अतिक्रमणधारकांनी रस्त्याच्या अर्ध्यापर्यंत जागा व्यापलेली आहे. सकाळी ९ ते ११ व संध्याकाळी ५ ते ८ या गर्दीच्या वेळेत रस्त्यावरून चालणे देखील कठीण झाले आहे. भाजीपाला विक्रेते, फळवाले, वडापाव, मिसळ, पाणीपुरी तसेच रसवंतीचे व्यावसायिक यांनी रस्त्याच्या कडेने गाड्या लावल्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत.

विशेषतः खालील ठिकाणी अतिक्रमण गंभीर स्वरूपात वाढलेले आहे: तसेच सागर पार्क समोर पेट्रोल पंपाजवळ, अल्पबचत भवन समोर, DYSP निवासस्थान समोर, भाऊंचे उद्यान समोर, हातनुर कॉलनी समोर, गुरांच्या दवाखान्याजवळ, या ठिकाणी रस्ता अरुंद असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तसेच, आकाशवाणी चौक ते महाबळ चौक या दरम्यान वाढत्या अतिक्रमणाबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.



