नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज अर्थसंकल्प सादर करतांना करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर केला असून यात त्यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. यात सर्वांचे लक्ष लागून असणार्या कर रचनेत देखील बदल करण्यात आला आहे. यानुसार आता सात लाख रूपयांपर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त असणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कर रचनेबाबत माहिती दिली. आता नव्या करप्रणालीनुसार ७ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. तर स्लॅबची संख्या सहावरून पाचवर आणण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय आता ९ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर केवळ ४५ हजार रुपयाचा तर १५ लाखाच्या वार्षिक उत्पन्नावर १.५ लाख रुपयांचा आयकर भरावा लागणार आहे.
यानुसार नव्या करश्रेणीत खालील प्रमाणे बदल झाले आहेत.
३ लाखांपर्यंत कोणताही कर नाही
३ ते ६ लाख ५ टक्के
६ ते ९ लाख १० टक्के
९ ते १२ लाख १५ टक्के
१२ ते १५ लाख २० टक्के
१५ लाखांहून जास्त ३० टक्के
आयकरची मर्यादा ही सरसकट सात लाखापर्यंत करण्यात आली आहे. तर ३ ते ६ लाख उत्पन्नावर ५ टक्के कर असणार आहे. ६ ते ९ लाख उत्पन्नावर १० टक्के कर आकारला जाईल. ९ ते १२ लाख उत्पन्न असेल तर १५ टक्के कर आकारला जाईल. १५ लाखांपेक्षा ज्यांचे जास्त उत्पन्न आहे त्यांना ३० टक्के कर असणार आहे.