विचार वारसा फाउंडेशनच्या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील मेहरूण परिसरातील रामेश्वर कॉलनी परिसरात सामाजिक क्षेत्रातील विचार वारसा फाउंडेशनतर्फे वार्षिक दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी गोरगरीब, दुर्बल घटकांसाठी नवीन वर्षात प्रबोधनात्मक उपक्रम घेण्यात येतील अशी माहिती संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांनी दिली.

विचार वारसा फाउंडेशनने मेहरूण परिसरातील अनेक भागांमध्ये सामाजिक कार्य करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली असून त्याचे प्रकाशन मान्यवरांनी केले. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य पल्लवी रवींद्र देशमुख, शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख संतोष पाटील, माजी नगरसेवक गणेश सोनवणे, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या शोभा चौधरी, जगतगुरु बचत गट अध्यक्ष अलका देशमुख, सामाजिक कार्यकर्ते भूषण लाडवंजारी, बी. एच. खंडाळकर,अशोक पाटील, सतीश जायभाये,गजानन सुरळकर,संदिप अमृत पाटील उपस्थित होते.

मेहरूण परिसरात अनेक गोरगरीब कुटुंबीय राहतात. पुढील वर्षी २०२५ साली त्यांच्यासाठी विविध प्रबोधनात्मक उपक्रम घेण्याचा मानस यावेळी संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांनी बोलून दाखविला. सूत्रसंचालन निलेश सपकाळे यांनी केले तर आभार राहुल देशमुख यांनी मानले. कार्यक्रमासाठी आशिष राजपूत, अभिजीत राजपूत, अक्षय गवई, ऋषी राजपूत, निखिल शेलार,मनिष चौधरी, संकेत म्हसकर, अमोल पनाड, आकाश तोमर, गौरव डांगे, राहुल पाटील, विर चौधरी,मंगेश मांडोळे, आकाश राजपूत, योगेश सनसे आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content