Home Cities जळगाव प्रभाग समिती क्रमांक ३ च्या सभापतीपदी रेखा पाटील यांची निवड

प्रभाग समिती क्रमांक ३ च्या सभापतीपदी रेखा पाटील यांची निवड


जळगाव राहूल शिरसाळे । महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २ च्या सभापतीपदी रेखा पाटील यांची निवड करण्यात आली. त्यांच्या पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निवडीची घोषणा केली. 

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड नगरसचिव अनिल गोराणे उपस्थित होते.  जळगाव महापालिकेच्या चार प्रभाग समितीच्या सभापतींची निवड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येत आहे. यापुर्वी प्रभाग समिती क्रमांक १ च्या सभापतीपदी सचिन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रभाग क्रमांक २ च्या सभापतीपदी प्रविण कोल्हे यांची निवड झाला. 

प्रभाग समिती ३ च्या सभापतीपदासाठी एकुण चार अर्ज दाखल करण्यात आले होते. यात भाजपाच्या बंडखोर रेखा पाटील, भाजपातर्फे धिरज सोनवणे, एमआयएमतर्फे शेख सहिदा आणि सुन्नाबी देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला होता. यात एमआयएमतर्फे शेख सहिदा आणि सुन्नाबी देशमुख यांचा अर्ज बाद करण्यात आला. उरलेले रेखा पाटील आणि धिरज सोनवणे यांसाठी मतदान झाले. यात रेखा पाटील यांना १० तर धिरज सोनवणे यांना ९ मते मिळाल्याने प्रभाग समिती क्रमांक ३ साठी रेखा पाटील यांची निवड करण्यात आली आहे. निवड झाल्याची घोषणा जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी अभिजित राऊत यांनी केली.


Protected Content

Play sound